अवैध रेती वाहतूक करणारा १२ चाकी टिप्पर पोलीसांच्या जाळ्यात
एक आरोपी अटक , ५० लाखांचा मुद्देमाल जप्त
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची मोठी कारवाई
कन्हान : - कन्हान शहरातील नागपूर - जबलपूर मार्गावर टेकाडी शिवारात उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई करत अवैध रेती वाहतूक करणारा १२ चाकी टिप्पर ट्रक जप्त केला . कारवाईत ५० लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून , एका आरोपीला अटक करण्यात आली आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार मंगळवार (२८ जानेवारी २०२५) रोजी संध्याकाळी ६:३० वाजता , उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.संतोष गायकवाड आपल्या स्टाफसह कन्हान परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना टेकाडी शिवारात मनसर वरून नागपूरकडे येणारा एक संशयित १२ चाकी टाटा टिप्पर (MH 40 CW 1717) दिसला .
पोलीसांनी तात्काळ टिप्पर थांबवून त्याची झडती घेतली असता , त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध रेती साठवलेली आढळली .
टिप्पर ट्रक चालक कडे रेती वाहतुकीचे कोणतेही अधिकृत परवाने किंवा रॉयल्टी नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले .
चालकाला ट्रक मालकाची माहिती विचारली असता , त्याने कोणतेही समाधानकारक उत्तर न देता माहिती नसल्याचे सांगितले . त्यामुळे पोलीसांनी चालक शादाब ह्यात पठाण (रा. वार्ड क्र. ४, जुने पोलीस स्टेशनसमोर, देवलापार) याला ताब्यात घेतले .
कारवाई दरम्यान पोलिसांनी ९ ब्रास रेती किंमत २७,००० रुपए आणि टाटा टिप्पर ट्रक किंमत ५०,००,००० रुपए असा एकूण ५०,२७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .
या प्रकरणी पोलीसांनी सरकार तर्फे फिर्यादी पोहवा राजेंद्र किसनजी मारबते यांच्या तक्रारी वरून
आरोपी शादाब पठाण विरोधात अप.क्र.६०/२५ , कलम ३०३(२) , ४९ , ४८(७) , ४८(८) , ४ , २१ , ३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे .
या कारवाईचे मार्गदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.संतोष गायकवाड , कन्हान पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी केले असून , पुढील तपास कन्हान पोलीस करत आहेत.
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time